भूत – ( भाग १ )
रेखा आज प्रथमच एकटी गावाला जायला निघाली होती. खर तर ती गेल्याच महिन्यात ती १८ वर्षाची झाली होती. पण तिला वाटत होत की ती खुप मोठी झाली आहे आणी तिने एकटीने बसने आजीकडे कोकणातल्या गावी जायचा हट्ट धरला व घरात सगळ्यांची संमती मिळवली. तिची बारावीची परिक्षाही आटोपली होती, त्यामुळे तिला पाठवण्यात बाकी काहीच अडचण नव्हती. तिच्या बाबांनी तिला रात्री बसमधे बसवले व सकाळी ती एकटी सुखरुप गावाला पोचली सुद्धा. मामा आला होता तिला स्टॅडावर उतरवुन घ्यायला. आजीच्या गावाच्या घरी जाताना मामाला त्याच्या पल्सरवर त्याच्यामागे घट्ट मिठी मारुन बसताना ती गावात घालवलेल्या तिच्या लहानपणाच्या मस्त आठवणींची उजळणी करत होती. आजीच्या गावाला रहायला रेखाला भारी आवडायचे. लहानपणापासुन तिच्या गावाच्या आठवणी इतक्या छान …