लेडीज होस्टेल… (भाग 1)
रती सुंदर विजयचा पिढीजात व्यवसाय माळ्याचा होता. पुण्याजवळच्या एका खेड्यात त्याचे गाव होते. तेथे त्याचे वडिलोपार्जित घर व थोडीशी शेती होती. विजयचे वडील सखाराम हेही माळीच होते. पुण्याजवळच्या एका प्रतिष्ठीत शिक्षण संस्थेत ते माळी म्हणून काम करत होते. त्या शिक्षण संस्थेचे एक मोठे कॉलेज होते. मुला, मुलींची वसतीगृहे होती. कॉलेजच्या आवारात एक मोठी बाग तसेच मागच्या बाजुला आमराई होती. त्या बागेचे अणि आमराईचे देखरेख करण्याचे काम सखारामचे होते. गेली वीसपंचवीस वर्षे ते इमाने एतबारे आपले काम चोख करत होते. त्यामुळे संस्थेच्या ट्रस्टींच्या विश्वासाला ते पात्र ठरले होते. सखारामला त्या कॉलेजच्या आवारातच रहायला घरही देण्यात आलेले होते. त्याला पत्नी, एक मुलगा व धाकटी मुलगी होती. त्याची पत्नी गावी राहून शेतीची काळजी …