सासूची काळजी – MARATHI FAMILY KATHA 1
विश्वास (वय २८) आणि कल्पना (वय २५) यांचं लग्न होऊन आता २ वर्षं झाली. दोघं एकत्र कॉलेजमध्ये शिकत असतानाच प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. कॉलेज झाल्या झाल्या दोघांनाही चांगल्या नोकऱ्या लागल्या होत्या. विश्वास फार चांगला मुलगा होता. कल्पनाच्या वडिलांना मात्र एकच चिंता होती आणि ती म्हणजे विश्वासला सावत्र आई होती. विश्वासची खरी आई तो ४ वर्षांचा असतानाच गेली. त्यानंतर काही वर्षं त्याच्या वडिलांनी त्याला एकट्याने सांभाळलं. पण एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत असणाऱ्या त्याच्या वडिलांना विश्वासकडे पुरेसं लक्ष देणं शक्य होईना झालं तेव्हा त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला. विश्वासची सावत्र आई मीरा ही फार चांगली बाई होती. तिने विश्वासला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं. …