घरी पोचल्यावर उत्तमने सर्व वृत्तांत सांगितला अन आपल्याला उद्याच निघावे लागेल अस म्हणून अपर्णा आणि गीतांजली ला आपापली तयारी करण्यास सांगितले..बरचस सामान न्यायच असल्याने स्पेशल गाडीच उत्तमने भाड्याने ठरवली होती..दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं ठरलं..अपर्णा आणि गीतांजली सकाळी लवकर उठून तयार झाल्या होत्या ..गाडीवाला सुद्धा लवकर आला होता .सर्व सामान गाडीत भरण्यास बाबा आणि प्रणय ने बरीच मदत केली आणि आई नुसती सुनेचे आणि लेकीचे कोडकौतुक करण्यात गुंतली होती..आईने लाडू , धपाटे अस बरच काही खाऊ डब्यातून दिल होत..आता उत्तम आईला म्हणाला अग आई उशीर होतोय चल आवर आता लवकर ..तशी आई डोळ्यात आसवं आणून म्हणाली, ” हो बाळा जा सावकाश आणि आईने सुनबाई ला हळद कुंकू लावल अन म्हणाली गेलास की आठवणीने फोन कर..आणि हो सूनबाई तू सुद्धा फोन करत जा आणि अपर्णा तू सुद्धा मदत कर वहिनीला..तसा उत्तम म्हणाला हो आई करतील त्या व्यवस्थित ..सर्वांच्या पाया पडून तिघेही निघाले ..
ड्रायव्हर च्या बाजूला उत्तम बसला होता आणि पाठीमागे दोघी बसल्या होत्या आणि पूर्ण पाठीमागे आणि डिकीत सामान खचून भरल होत..तरीही उत्तमला तिथे जाऊन अजून बरच सामान घ्यायचं होत..अपर्णा आणि गीतांजली मधल्या सीट वरून दोन्ही बाजूचा नजारा पाहत होत्या..गीतांजली ही खरच खुप सुंदर आणि रेखीव होती..अगदी देवाने तिला भरभरून सौन्दर्य बहाल केल होत.पाहताक्षणी भुरळ पडावी अस सौन्दर्य होत तीच..केसांच्या बटा नेहमी तिच्या चेहऱ्यावर यायच्या…लांबसडक केस , काळेभोर डोळे..निमुळती रेखीव हनुवटी, नाजूक ओठ अन अगदी जशी गिरीजा ओक प्रमाणे दिसायला होती..हसल्यावर तर खूपच सुंदर दिसायची..या उलट अपर्णा चे केस छोटे असून नेहमी सोडलेले असायचे यु कट प्रमाणे तिचे केस होते तिला ते छान शोभायचे..अपर्णा नेहमी वेगवेगळे पंजाबी ड्रेस , टॉप ,पायजमा, कुर्ता असे वेगवेगळे प्रकार नेसायची..तशी उंचीने जास्त नव्हती पण चुलबुली होती..नुकतीच वयात आलेली आणि मस्त भरलेली होती गोरी गोरी आणि जणू आयेशा टाकिया सारखी फिगर..ड्रायव्हर दोघांकडे सुद्धा सारखा आरशातुन पाहत होता..
वाऱ्याबरोबर झुलणाऱ्या बटा लयबद्ध ताल निर्माण करत होत्या अन ड्रायव्हर च लक्ष सारख तिकडे जात होतं..दोघींच्याही लक्षात आलं होतं म्हणून दोघीही दरवाजाला चिकटून बसल्या जेणेकरून त्याला आरशातून दिसू नये..ड्रायव्हर नाराज झाला अन जोरात गाडी मारायला लागला..तसे उत्तमने त्याला हळू गाडी चालवायला सांगितली..अगदी नाईलाजाने त्याने गाडीचा वेग कमी केला..बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर इच्छित स्थळ आलं होतं..खर काम तर यापुढे होत कारण सर्व आणलेलं सामान लावायचं होत तसेच साफसफाई सुद्धा करावी लागणार होती..
ड्रायव्हर तर सामान उतरून केव्हाच गाडी घेऊन गेला होता..उत्तम ने अगोदरच शिपायाला सांगून ठेवल्याने त्यांनी दोन कामगार पाठवले होते..त्यांच्या मदतीने सर्वांनी हातभार लावून एकदाच सामान लावलं..आणि साफसफाई सुद्धा केली होती..गीतांजली आणि अपर्णा दोघीही साफसफाई करताना कामगार मात्र त्यांना न्याहाळत होते..अगदी मदत करताना चुकून स्पर्श करायची संधी पाहत होते परंतु दोघीही अंतर ठेवूनच राहत असल्याने त्यांचा हिरमोड होत होता..
शेवटी एकदाच घर लावून झालं होतं..आणि कामगारांना बिदागी देऊन उत्तमने त्यांना निरोप दिला.म्हणता म्हणता रात्र झाली होती..आता मस्तपैकी फ्रेश होऊन जेवणाची तयारी करायला दोघी लागल्या आणि दुसऱ्या दिवशी उरलेलं किरकोळ काम करणार होत्या..तो दिवस संपून दुसरा दिवस उजाडला..अन उत्तम आज शाळेत हजर व्हायला निघाला होता ..गीतांजली ने डबा बनवून दिला अन उत्तम निघाला..पहिल्याच दिवशी सर्व स्टाफ ने सुंदर अस स्वागत केलं अन मुख्याध्यापक यांनी उत्तमला वर्गाची जबाबदारी दिली..आठवी चा वर्गाचे वर्गशिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली होती..उत्तम आठवीच्या वर्गात गेला अन मुलांचा ठाव घेतला..काही टारगट तर काही शांत तर काही मध्यम अशी सगळीकडे असतात तशी मुलं त्याही ठिकाणी होती..उत्तम तसा कडक शिस्तीचा होता त्यामुळे टारगट मुलांना कसं वठणीवर आणायचे त्याला माहित होतं..तशी पूर्वी शाळा दहावी पर्यंत होती पण अलीकडेच शाळेला ज्युनियर कॉलेज च्या वर्गांची मान्यता मिळाल्याने अकरावी ,बारावी सुद्धा वर्ग होते..तसा उत्तमचा संबंध फक्त दहावी पर्यन्त च होता..एकंदरीत उत्तमने फारच लवकर समजून घेऊन मुख्याध्यापक सरांची मर्जी प्राप्त केली होती..शाळा आणि कॉलेज मध्ये मिळून दहा पंधरा शिक्षक होते त्यात पाच महिला शिक्षक होत्या..शिपाई आणि क्लार्क धरून एकूण पंचवीस जणांचा स्टाफ होता..तशी संस्था नावाजलेली होती अन प्रगती देखील छान होती..एकंदरीत उत्तमच्या प्रतिभेला चांगला वाव या प्रशालेत मिळणार होता..तसा उत्तम पहिल्यापासून च मितभाषी, संयमी आणि कुटुंबवत्सल होता..आई वडील , थोरा मोठ्यांचा मान राखणारा होता..
इकडे गीतांजली आणि अपर्णा मात्र नवीन ठिकाण असल्याने तशा बुजून राहायच्या..जास्त घराबाहेर पडायच्या नाहीत.परंतु पाण्यासाठी तरी त्यांना घरमालकाच्या विहिरीवर जावं लागायचं..मालक तिथला मोठी हस्ती होता..त्याला दोन मुलगे होते अगदी तरुण वयाचे आणि मालक अंदाजे पंचावन्न वयाचा असावा..त्याच घर एका मोठ्या हवेली प्रमाणे होत..जमीन जुमला देखील भरपूर होता..अगदी गावच्या पाटील प्रमाणे त्याचा रुबाब होता..भरदार मिशा असल्याने त्याचे व्यक्तिमत्व तसेच भारदार होत..आवाज देखील करारी होता…नाव सुद्धा ऐटबाज म्हणजेच रंगराव अस होत..नावाप्रमाणेच शौकीन असावा म्हणूनच की काय त्याने शिकारीचा छंद ही जोपासला होता..त्याची दोन्ही मुलं तशी त्याच्याच वळणावर होती..एकाचे नाव होते दुर्लभ आणि दुसऱ्याचे होते अर्णव..
या रंगरावाची एक छोटी बहीण याच गावात प्रेमविवाह करून स्थायिक झाली होती..त्यावेळी खुप मोठं रणकंदन झालं होतं..अगदी हाणामारी पर्यन्त गेलं होतं परंतु कालांतराने सगळं नीट होऊन रंगरावाच्या शिफारशीनेच याच प्रशालेमध्ये तिला शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती..ती तशी बोल्ड स्वभावाची होती अन ठळक मेकअप करून भडक कपड्यांची तिची आवड होती..तिचे नाव होतं अस्मिता…अस्मिता मराठी विषय शिकवायची ,गाण्याची तिला फार आवड होती अन कवितांना सुंदर चाली लावून त्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या..
रंगरावाचा तसा आपल्या धाकट्या बहिणीवर खूप जीव होता..प्रत्येक व्यक्तीचा एक हळवा कोपरा असतो तसा त्याचा त्याची बहीण अस्मिता होती..अस्मिता आणि रंगराव मध्ये वयात तसा फार फरक होता..रंगराव पन्नाशी पार तर अस्मिता चाळीशीत होती..आणि दिसायलाही सुंदर होती पण रंगराव ची बहीण असल्याने जरा सर्व दबकूनच असायचे..उगाच नसती आफत नको म्हणून कुणी तिच्या फंदात पडायचं नाही..आणि शाळेत राजाराम शिपाई हा पक्का रंगरावाचा खबरी होता..गावातील आणि शाळेतील बातम्या बरोबर तो रंगरावाला पोचवायचा..एके दिवशी उत्तम ऑफ पिरियड ला शाळेच्या संगीत खोली मध्ये हार्मोनियम वाजवत बसला होता…
त्याचवेळी अस्मिताने उत्तमला हार्मोनियम वाजवताना पाहिलं अन ती आत आली.अन म्हणाली, वा खूप छान वाजवता तुम्ही..ही कला तुमच्यात आहे माहीत नव्हतं,.तसा उत्तम कावरा झाला.बुजऱ्या स्वभावाचा असल्याने तो जास्त बोलत नव्हता तरी तो म्हणाला, नाही म्हटलं मला लेक्चर नव्हतं म्हणून जरा इकडे आलो..तशी अस्मिता म्हणाली, खूप छान वाजवता तुम्ही..तुम्हाला हरकत नसेल तर माझ्या कवितांना चाल देऊन सुरात बसवा ना..आणि हार्मोनियम मुळे मुलं सुद्धा सुरात म्हणतील..तसा उत्तम म्हणाला ,अहो एवढं कुठे मला येत..तशी अस्मिता म्हणाली, अहो काय नाही मी ऐकलंय खुप छान वाजवता तुम्ही..चला वाजवा बघू..अन अस्मिताने जणू उत्तमला बळेच वाजवायला लावलं..कविता म्हणताना अस्मिता तशी उत्तमला खेटून उभी राहिली होती ..उत्तम मात्र आपलं अंग चोरत होता आणि त्यांची ही संगीत साधना राजाराम शिपायाने पाहिली..
क्रमशः