नमस्कार ही कहाणी आहे एका परगावात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या कुटुंबाची..एक मध्यमवर्गीय कुटुंब..नुकताच लग्न झालेला उत्तम अन त्याच वर्षी त्याला शिक्षकाची नोकरी देखील लागली होती..परंतु नोकरी खुप दूर असलेल्या गावी होती..उत्तम आपल्या पत्नीला म्हणजेच गीतांजली ला म्हणाला, गीतू तू माझ्या आयुष्यात आलीस अन मला लॉटरी च लागली.आपलं लग्न काय झालं अन मला नोकरी सुद्धा लागली..तशी गीतांजली म्हणाली, अहो ही तर तुमची मेहनत मी आपली निमित्तमात्र..उत्तम नवीनच लग्न झाल्याने आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता.सारखी त्याला ती समोर असायला हवी होती..उत्तम म्हणाला अग पण आपल्याला आता त्या गावी राहावे लागणार ..
शेवटी नोकरी आहे म्हटल्यावर जावंच लागणार ..तशी गीतांजली म्हणाली, ” हो ना इकडची खूप आठवण येईल नंतर आणि तुम्ही काय ठरवलंय कोण कोण जाऊया तिकडे..कोण म्हणजे .? तू तर असणारच आहेस माझ्या सोबत..मला जेवण कोण करून देईल नाहीतर.आणि( तिला जवळ घेत,) हे तरी कुठे मिळणार नाहीतर..अहो सोडा ना कुणी पाहिलं तर..बेडरूम नाही आहे ही..”हो ग माहीत आहे मला” तशी गीतांजली दूर होते , उत्तम सांगतो की मला वाटत अपर्णा ला आपण सोबत घेऊन जाऊ ..आई बाबा आणि भाऊ इथे राहतील..(अपर्णा उत्तम ची छोटी बहीण होती जी नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती..) आणि मी बाहेर असताना तुलाही मदत होईल..आणि तिलाही तिथे नवीन कोर्स लावून देऊ म्हणजे तिला पुढे उपयोगी पडेल..गीतांजली म्हणाली बर बाबा तुम्ही सांगाल तसं..बरं हे आई बाबांना कधी सांगणार आहात..तसा उत्तम उत्तरला अग आज रात्री जेवताना विषय काढू अन सांगू..
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली अन सर्वांची ताटे मांडली गेली..उत्तम ने मोका बघून विषय काढला . बाबा तुम्हाला माहीतच आहे की मला नोकरी लागली आहे ..आणि नोकरीच ठिकाण खूप दूर आहे अन तिथे राहिल्याशिवाय पर्याय नाही आहे..तसे बाबा म्हणाले, “मग काय ठरवलंस तू..? उत्तम म्हणाला, मला आणि गीतांजलीला तर जावंच लागेल पण मी म्हणतो जर अपर्णा आली तर हिला पण मदत होईल.आणि तिला जो कोर्स हवा आहे तो सुद्धा तिकडे मिळेल तसही आपल्या गावी काही सुविधा किंवा मोठे कोर्स नाही आहेत .तिथे राहून ती चांगली शिकेल सुद्धा..तसा बाबांनी विचार केला अन म्हणाले, ” आई काय म्हणते बघ तुझी, हिला जमेल का इकडे एकटीने करायला..तशी आई म्हणाली, ” अहो मी काय अजून म्हातारी नाही झालीय..चांगली धडधाकट आहे. जाऊदे अपर्णाला ..मी एकटी सांभाळेंन..तसे बाबा म्हणाले, मग झालं तर कसला प्रश्नच नाही..उत्तम तू तुझी नोकरी सांभाळ इकडची काळजी करू नको आणि आमच्यासोबत प्रणय आहे ना(प्रणय उत्तमचा धाकटा भाऊ) बाबा तुम्ही म्हणता तर मला काळजी नाही मी अधून मधून येत जाईन तसेच तुम्हाला आठवण आली की तुम्ही ही या अधून मधून..तशी आईने डोळ्याच्या कडा पुसत म्हणाली, “आता कुठे हिला सासुरवास सुरू होणार होता तोच आमची ताटातूट झाली..तसे बाबा म्हणाले , तर तर तुला सासूचा रुबाब दाखवायला मिळाला नाही ना म्हणून दुःख होतेय ..अन सगळेच हसले..तस नाही ओ पण नवीन सुनेचे कोड कौतुक सुद्धा करायचे असते ना..तशी गीतांजली म्हणाली, सासूबाई तुम्ही मध्ये मध्ये या ना तिकडे..ऐकून बाबा म्हणाले, तर तर आणि आम्ही इथे काय करायचं..तशी आई शरमली अन म्हणाली अहो काय हे ..आणि मी काही तुम्हाला एकटं ठेऊन नाही जाणार ..बरं बाबा आधी त्यांना तिथे जाऊदे तरी मग बघू कस काय ते..अन बाबांनी विषय तिथल्या तिथे संपवला..
तसही उत्तमने एकटाच आधी जाऊन राहायची सोय पाहायचा निर्णय घेतला होता अन नंतर गीतांजली आणि अपर्णाला सोबत घेऊन जाणार होता..दुसऱ्या दिवशीच उत्तम पहाटेच्या गाडीने जायला निघाला..अन दुपारी तीन वाजता नोकरीच्या ठिकाणी पोचला होता.
आधी शाळा बघून यावी म्हणून तो शाळेत आला अन त्याला शाळा खूपच आवडली..मोठे पटांगण होते आणि छान सजवलेली शाळा होती..तिकडच्या मुख्याध्यापकाना उत्तम भेटला..
त्यांनीही त्याचे खुप छान स्वागत केले , सर्वांची ओळख करून दिली , वर्ग दाखवले .मुलांशी ओळख करून दिली.अन म्हणाले चला मिस्टर उत्तम आपण केबिन मध्ये चहा घेऊ..मुख्याध्यापक यांनी चहा मागवला..चहा पिता पिता उत्तम म्हणाला , सर इथे चांगली राहायची सोय झाली असती तर बरं झालं असत..तसे सर म्हणाले, कसं आहे उत्तम सर राहण्याची ठिकाण भेटतील पण आजूबाजूला वातावरण चांगले पाहिजे ना ..उत्तम म्हणाला म्हणजे..? अहो म्हणजे कसं असत घर चांगलं असलं तर पाणी नसत, पाणी असलं तर बाजूला वस्ती चांगली नाही, आणि वस्ती असली तरी मालक चांगला मिळाला पाहिजे..तरीपण आज काही ठिकाणी मी तुमच्यासोबत शिपायाला पाठवतो तो बघून देईल व्यवस्था.
गावातीलच असल्याने त्याला बऱ्यापैकी माहिती आहे.आणि आज उशीर झाला तर घाबरू नका माझ्या घरी तुम्ही निश्चिंत राहू शकता अगदी तुमची सोय होईपर्यंत..उत्तमला थोडं हायस वाटलं..चहा पिऊन उत्तम आणि शिपाई भाड्याचे घर शोधायला निघाले..बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर उत्तमला एक घर पसंद पडले ..आजू बाजूला तशी वस्ती होती आणि घर खूप दिवस बंदच होत.मालकाने ते घर अजून भाड्याला कुणाला दिल नव्हत ..फार्महाऊस पद्धतीने ते घर बांधले होत..शिपायाने (त्याच नाव होतं राजाराम) मालकाशी बोलणी केली..हो ना करता करता महिना पाच हजार भाड ठरलं..उत्तमला जशी प्रायव्हसी हवी होती तशी या घरात होती म्हणून त्याने आढेवेढे न घेता हेच घर फिक्स केलं..अन उत्तम मुख्याध्यापक सरांचा निरोप घेऊन आपल्या गावी यायला निघाला..
क्रमशः