राजभोग
सुधारत्या आर्थिक व सामजिक परिस्थितीमुळे माझ्या आजबाजूस आता राजकारणी पुढारी लोकांचे घोळके वाढू लागले होते. इच्छा नसतानाही मी नकळत राजकारणात ओढला जाऊ लागलो होतो. तसा ग्रामीण भाग असल्याने तथाकथित समाजकार्यास बराच वाव होता. वेगवेगळ्या योजना आणण्याची पुढाऱ्यांमधे रस्सीखेच चालू होती. एकदा अशाच एका कामाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तेजस्विनी नाईक आमच्या गावी येणार होत्या. गोव्यावरून मुंबईला जाता जाता येथील कार्यक्रम उरकुन जाण्याचे त्यांचे नियोजन होते. पण वेळापत्रकात थोडा बदल झाल्याने त्या आदल्या दिवशी रात्रीच गावात येणार असं ठरलं. गावात हॉटेल नावाचा प्रकार अस्तित्त्वात नसल्याने साहजिकच सगळे पुढारी आमच्या फार्महाउसवर त्यांची सोय करावी म्हणून गळ घालू लागले. आमचे फार्महॉउस म्हणजे डोंगरउतारावरील बंगला. गावापासून तीन चार किलोमीटर अंतर! तेथे माझ्याव्यतिरिक्त माझ्या कुटुंबातीलही …