अच्छा… तर मी तुमच्या बाळाचा बाप होणार
माझं नुकतच लग्न झालं. मला सुस्वरूप पत्नी मिळाली. राणी तिचं नांव. माझा नव्या नवलाईचा संसार बहरत असतांना एका प्रणयाच्या रात्री माझ्या राणीने विचारले, ‘राजन, मी आज माझ्या मैत्रीणीकडे बाजूच्या मोहल्ल्यात गेली होती. तेथे तिच्या मुलीच्या सोबत बाजूची एक लहानशी मुलगी खेळत होती. ती अगदी तुमच्या चेहर्याो सारखी सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे सारखी निरखून पाहत असतांना माझी मैत्रीण मला म्हणाली. “अग, ही तुझ्याच नवर्याच पासून झालेली मुलगी आहे… म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय नी खोटं काय मला नक्की माहीत नाही.”पण तिचं हे बोलणं ऐकून मी चक्रावूनच गेली. हे कसं शक्य आहे ? मी दिवसभर सारखा तोच विचार करीत आहे. तुम्हाला पहिली बायको तर नाही ना किवा तुमचं कुणाशी काही …