लेखक – राहुल दुबे
मामी, मला थोडं बोलायचं आहे. “
“हां, बोला ना! काय झालं?” मामीने माझ्याकडे न पाहता प्रश्न केला.मला वाटतं मामी मला टाळत होती आणि फक्त रिप्लाय द्यायचा म्हणून देत होती म्हणून मी जरा जास्तच गंभीर होत बोललो.”महत्त्वाचं आहे. तुम्ही तिकडे तोंड करून बोलणार असाल तर मला बोलता येणार नाही.”मी असं निक्षून बोलल्यामुळे मामीचा नाईलाज झाला आणि तिने गॅस कमी करून माझ्याकडे पहिलं.”बोला ! एव्हढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे?” मामीने थोड्या उत्सुकतेने विचारलं.”मी गावी जायचं म्हणतोय” मी सरळ मुद्द्याला हाथ घालत म्हटलं.
मामीला बहुदा हे अपेक्षित नसावं म्हणून तिने गॅस बंद केला आणि माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य आणि चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते.”का ओ, काय झालं अचानक?” मामीने विचारलं.
“काही झालं नाही पण विचार करतोय मला येऊन आता एक महिना होत आलाय. असंच किती दिवस राहणार आणि जॉबचं पण कुठे जमत नाही. म्हणून विचार करतोय गावी जाऊन दुसरं काहीतरी करावं” मी सरळ सांगून टाकलं पण खरं कारण लपवलं. खरं बोलून मला मामीला दुखवायचं नव्हतं.”तुम्हाला कोणी काही बोललं का? असं का बोलताय? एक महिना झाला म्हणून काय झालं? आम्ही तुम्हाला बोललो का की आता तुम्ही जॉब शोधायला चालू करा म्हणून?” मामीने प्रश्नांची सरबती सुरू केली. “तसं नाही! मला कोणी काही बोललं नाही. ना तुम्ही मी जॉब शोधावा म्हणून मागे लागला आहे. पण मलाच ठीक नाही वाटत म्हणून बोललो.” मी स्पष्टीकरण दिलं.मामीने तिच्या नेहमीच्या शैलीमध्ये, दोन्ही हाथ कमरेवर आणि डोळे बारीक करून माझ्याकडे थोडा वेळ पाहिलं न बोलली.”खोटं बोलता येत नसेल तर बोलू नये माणसानं तुमच्या चेहऱ्यावरील भाव सरळ सरळ सांगतायत की तुम्ही खोटं बोलताय म्हणून. म्हणे महिना झाला येऊन अन जॉब नाही भेटत.
जॉब भेटायला तुम्ही शोधला का तरी ? इथे तुम्हाला आणताना आपलं काय ठरलं होतं आठवतंय का तरी ? तेव्हा थापा मारणं बंद करा आणि काय झालंय ते अगदी स्पष्ट सांगा बघू” मामीने माझी चोरी पकडत दरडावत विचारलं.तिचं म्हणणं बरोबर होतं. मी इथे येताना मामा आणि मामी, दोघे पण बोलले होते की मी इथे आल्यानंतर काही दिवस निवांत राहावं आणि मग जॉब शोधावा. त्याला कारण अस होतं की एकदा का जॉब लागला की माणसाची हालत अगदी कुत्र्यासारखी होते आणि त्याला निवांत वेळ मिळत नाही. विशेष म्हणजे हा डायलॉग मामाचाच होता.
मी पण काही क्षण मामीकडे पाहिलं आणि बोललो, “मामी मला खरं कारण नाही सांगता येणार. ते इच्छा असून पण मी सांगू नाही शकत. तेव्हा प्लीज मला जाऊ द्या.”नाही, ते शक्य नाही. तुम्ही असे निघून गेल्यावर मी वहिनींना (म्हणजे माझी आई) काय उत्तर देऊ?” मामीने तिची काळजी बोलून दाखवत पुढे म्हटलं, ” तुम्हाला इथे चांगला जॉब लागेपर्यंत तुमची काळजी घेण्याचा शब्द दिलाय मी त्यांना. तेव्हा मी तुम्हाला असं जाऊ देऊ शकत नाही. तुम्हाला खरं काय आहे ते सांगावच लागेल. “
“मामी मी खरंच नाही सांगू शकणार. सांगण्याजोगं नाहीये ते.” मी कळवळत बोललो.”सांगण्यासारखं नाही म्हणजे? असलं काय आहे ? गणेश, खरं सांगा याच्या आधी आपल्यामध्ये काही लपून राहिलंय का? मी तुम्हाला माझा भाचा न मानता एक मित्र मानते आणि तुम्ही असं वागता? कारण काहीही असू दे. मला ऐकायचं आहे. नसेल सांगायचं तर नका सांगू. यांना सांगून तुमची गावाला जायची व्यवस्था करते. पण याद राखा, इथून पुढे तुमच्याशी बोलणंच काय तुमचं तोंड ही नाही पाहणार. जा तुम्ही तुमच्या मार्गाने.” मामीने अगदीच टोकाची भूमिका घेतल्याने मला काय करावं तेच सुचेना.माझी चुळबुळ जास्तच वाढली. खरं कारण सांगावं तरी कसा हा माझ्या समोर मोठा प्रश्न होता.
माझी ती आवस्था पाहून मामीने माझ्या खांद्यावर हात ठेवत परत विचारलं,”काय भानगड आहे सांगा तरी. एव्हढा विश्वास नाही का आपल्या मामीवर?” मामीने एव्हढ्या आपुलकीने विचारल्यावर माझा नाईलाज झाला तरीपण मी जरा चाचरत विचारलं,
“खरं कारण सांगितलं तर रागावणार तर नाही ना?”
“नाही ओ! बिंधास्त बोला. आपण मार्ग काढू.”
मामीने आश्वासन दिल्यावर माझा धीर वाढला न चाचपडत बोललो,”मामी, मला वाटतंय माझ्यामूळे मामा आणि तुमच्या मध्ये दुरावा निर्माण झालाय. मला तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक अडचण म्हणून नाही रहायचं. मला वाटतंय मी तुमचं सुख हिरावून घेतोय.” मी चाचपडत पण एका दमात बोलून गेलो.मी असं बोलताच मामी तोंडावर हाथ ठेऊन खळखळून हसायला लागली. मी थोडा गोंधळून गेलो. मला वाटलं होतं मामी काहीतरी खरं खोटं ऐकवेल पण इथे तर उलटंच घडत होतं. माझा गोंधळलेला चेहरा आपलं हसू आवरतं घेतलं आणि माझ्याकडे निरखून पाहत बोलली.
पाहून मामीने “म्हणजे हे फॅड तुमच्या डोक्यात कालच्या प्रसंगामुळे आलंय तर! आणि काय पण ते शब्द ! दुरावा निर्माण झालाय… अडचण म्हणून नाही रहायचं… आणि सुख हिरावून घेतोय!… कुठे शिकलात असले शब्द ? कादंबऱ्या जास्त वाचता वाटतं!” असं बोलत मामी परत हसू लागली.मी थोडा त्रासून बोललो, “मामी प्लिज, चेष्टा नको. मी सिरीयसली बोलतोय.”ओह! सॉरी, मला तुमची थट्टा करायची नव्हती.
पण तुम्ही इतक्या मामुली गोष्टीचं एव्हढं टेन्शन घेतलंय म्हणून मला हसू आलंय. आणि हो माझा अंदाज खरा ठरला तर.” मामी डोळे मिचकावत बोलली.”तुमचा अंदाज ? कशाचा?” मी उत्सुकतेने काही न कळल्यामुळे विचारलं.”आता जे तुम्ही मला बोललात ना की मला काही महत्त्वाच बोलायचं आहे तेव्हाच मला अंदाज आला होता. पण तुम्ही एव्हड्या स्पष्टपणे बोलाल अस नव्हतं वाटलं ” मामीने खुलासा केला.कमाल आहे! या बाईला सगळं माहीत असून पण माझ्याकडून खोदून खोदून सगळं कडून घेतलं. आधीच बोलली असती तर माझी एव्हढी फाटली नसती ना. आणि ही गोष्ट यांना मामुली कशी वाटू शकते याचंच मला नवल वाटत होतं.”कसला विचार करताय? आधी तो गावी जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाका.
आम्ही काय तुम्हाला जाऊ देणार नाही. कारण पण किती फालतू आहे गावी जाण्याचं!” मामी परत हसत बोलली.
क्रमशः